मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमाकडून महिलांसाठी विशेष बेस्ट बस सेवा सुरु करण्यात आली आहे. ही महिला विशेष बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नँशनल सेंटर फाँर दि परफाँमिग आर्टस (एनसीपीए) या मार्गावर धावनार आहे. ही बससेवा गुरूवार पासून सूरु झाली आहे. सकाळी ८:०५ ते ११:३०आणि दुपारी४:३०ते रात्री ८ या वेळेत दर सात मिनिटांनी ही बससेवा सूरु राहणार आहे. अशा ३७ “तेजस्विनी”बस गाड्या महिलांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही बससेवा सरु करण्यात आल्या आहेत. यापैकी सहा बसगाड्या बेस्ट च्या ताब्यात आहेत. गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर १० बस गाड्या प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदनीसाठी आहेत. तेजस्विनी बसगाडीमध्ये ३५ आसन व्यवस्था असून त्या विनावातानुकूलित आहेत.