तामिळनाडूमध्ये राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फतवा काढण्यात आला आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांना साडी किंवा चुडीदारची (ओढणीसह) सक्ती करण्यात आली आहे. सोबर दिसणाऱ्या ओढणीचाच चुडीदार घालण्याची सक्ती आहे. ही सक्ती केवळ महिला कर्मचाऱ्यांवर नाही तर, पुरुष कर्मचाऱ्यांनाही शर्टसोबत फॉर्मल पँट आणि धोती किंवा तामिळ परंपरेतील वेष्टी परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता तामिळनाडूमध्ये कोठेही सरकारी कर्मचारी मग ती महिला असो किंवा पुरुष जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसणार नाही. हे स्पष्ट झालं आहे.
राज्य महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर असताना साडी, सभ्यता दर्शवणाऱ्या ओढणीसह चुडीदारच घालावेत. तर, पुरुषांनी शर्टसह धोतर किंवा इतर अन्य कोणताही पारंपरिक पोशाख करावा. कर्मचाऱ्यांनी कॅज्युअल कपडे न घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव गिरीजा विध्यानंदन यांनी हा फतवा काढला आहे. त्यामध्ये स्वच्छ आणि फॉर्मल कपडे घातल्यामुळे राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये एक चांगले वातावरण तयार होईल, ज्याचा कामावरही सकारात्मक परिणाम होईल, असे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
या फतव्यामागे भारतीय आणि तामिळ परंपरा जपण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. पण, एखादी परंपरा जपण्यासाठी कपड्यांची सक्ती करणे योग्य आहे का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारचा कपड्या्ंबाबतचा अजब फतवा चांगला की वाईट, याविषयी वेगवेगळी मते व्यक्त होऊ लागली आहेत. यासंदर्भात आम्ही काही तरुणींशी बातचीत केली असता त्यांनी मांडलेली त्यांची मत पाहा…
https://youtu.be/xcSNc0t-bWs