आताच्या राज्यकर्त्यांना हे संविधान मान्य नाही- स्वरा भास्करची भाजपवर टीका
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनानंतर स्वरा भास्कर थेट सरकारविरुद्ध भूमिका मांडताना दिसत आहे.
तिच्या भूमिकेमुळे ती नेहमीच वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असते. अलीकडे दिल्ली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU)मध्ये ५ जानेवारीला उशीरा रात्री विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यामुळे स्वरा भास्करनी भूमिका घेत तिने सरकारविरुद्ध अनेकदा जाहीर मतप्रदर्शन केलं. एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात शनिवारी(दि.18) पुण्यात संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली असता केंद्र सरकारवर टीका करत 1947 साली नागरिकांनी संविधान मान्य केले. मात्र आताच्या राज्यकर्त्यांना हेच संविधान मान्य नाही अशी खंत तिने यावेळी व्यक्त केली.