माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनवणार असल्याची चर्चा आहे. अशी बातमी खुद्द केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करुन सांगितली असून त्यांनी सुषमा स्वराज यांना शुभेच्छा ही दिल्या.
काय म्हटलं डॉ. हर्षवर्धन यांनी...
"भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या दीदी, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्यानिमित्ताने खूप-खूप शुभेच्छा असं ट्वीट हर्षवर्धन यांनी केलं होतं."
मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलिट करुन टाकलं.
सुषमा स्वराज या आंध्र प्रदेशच्या राज्यपाल होणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच "सुषमा स्वराज यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टपणे सांगितलं.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/1138133887266148355
परराष्ट्र मंत्री पदाच्या कामातून मुक्त झाल्याच्यानिमित्ताने आपण उपराष्ट्रपति वेंकैया नायडू यांची भेट घेतली होती असं त्यांनी ट्वीटरवरुन सांगितले."
https://twitter.com/SushmaSwaraj/status/1138131750737960960
त्यांच्या या भेटीनंतर आंध्रप्रदेशच्या सुषमा स्वराज राज्यपाल होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं मात्र याला खुद्द स्वराज यांनी पूर्णविराम देत हे वृत्त खोटं असल्याचे सांगितले.
(मॅक्सवुमनचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)