काय म्हटल्या तिहेरी तलाकवर महिला लोकप्रतिनिधी?

Update: 2019-07-26 08:23 GMT

लोकसभेत तिहेरी तलाकवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना त्यांनी महिलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका, तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध नाही, पण पद्धतीला विरोध आहे. महिला आरक्षणालाही केंद्रानं मंजुरी द्यावी. सामाजिक बदल हा झालाच पाहिजे. काय चुकीचं आणि काय बरोबर ही येणारी पिढी ठरवेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तर दुसरी कडे स्मृति इरानी यांनी यावर भाष्य करताना या विधेयकाची मांडणी मानवतेच्या दृष्टीकोनातून केली आहे. ज्यांना असं वाटत आहे की, हे विधेयक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलं आहे. त्यांना माझं हेच सांगण आहे की हे महिलांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी तयार केलंल विधेयक आहे. लवकरच मुस्लीम महिलांना त्यांचा न्याय मिळणार आहे.

दरम्यान हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव झाला नाही पाहिजे असं बिहारमधील काँग्रेसच्या रंजित रंजन यांनी म्हटलं.

Similar News