शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहीली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि पावाराचे राजकारणापलिकडे आपूलकीचे संबंध आहेत. सकाळीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना बाळासाहेबांना आदरांजली देऊन म्हटल की, “प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला.” त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले आहे.
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथि. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/6sgue9fejy
— Supriya Sule (@supriya_sule) November 17, 2019