निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलावी अशी विनंती करणारी याचिका आरोपींच्या वकिलांनी रात्री उशिरा दाखल केली. त्यावर सुप्रीम कोर्टात रात्री अडीच वाजता सुनावणी घेतली गेली. पण कोर्टानं या आरोपींची याचिका फेटाळून लावली.
निर्भया प्रकरणातील दोषींच्या वकिलांनी म्हणजेच ए.पी. सिंग यांनी दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. रात्री अडीच वाजता यावर सुनावणी घेण्यात आली. पवन कुमार हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा मुद्दा वकिलांनी उपस्थित केला. पण कोर्चानं वकिलांच्या युक्तीवादात कोणतीही नवीन गोष्ट नसल्याचं सांगत ही याचिका फेटाळली.