उद्धव ठाकरे यांचा आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या महिलेचं भाजप कनेक्शन

Update: 2020-08-07 02:26 GMT

सुनयना होले नावाच्या महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून २५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून त्यांचा मौलवीच्या वेशातील फोटो ट्विटरवर पोस्ट केला. उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात दाखवण्यात आले आहे तर आदित्य यांच्या फोटोत साप दूध पितानाचा फोटो इन्सर्ट करण्यात आला आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी आणखी एक ट्विट करण्यात आले असून त्यात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये #SushantSinghRajput #CBICantBeDeniedForSSR हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. या विरोधात अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.

अशा प्रकारे अमोर आलं भाजप कनेक्शन...

सुनयना होले नावाच्या महिलेविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या नंतर सदर महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र या महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांनी भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांना सदर प्रकरात महिलेची मदत करण्यासं सांगीतलं. बग्गा यांच्या सांगण्यावरून दवे यांनी या महिलेला जामिन मिळऊन दिला. त्यांचा हा संवाद त्यांनी ट्वीटर साधल्यामुळे या प्रकरणातील भाजप कनेक्शन समोर आले आहे.

दरम्यान, सदर महिले विरोधात पोलीसांनी भा. दं. वी. कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Similar News