साताऱ्याच्या अश्विनी भिसे... त्या घरात असतानाच डॉल्बीच्या आवाजाने उभी भिंत कोसळली. मातीच्या ढिगाऱ्यातून नवऱ्याने त्यांना कसं बसं शोधून काढलं. पण, पुढचा एक महिना हॉस्पीटलच्या खाटेवर दिवस काढावे लागले. या कठीण प्रसंगातून त्या मोठ्या धीराने सावरल्या. साध उभं राहता येत नव्हतं पण, एक एक पाऊल टाकत त्या आज चालू लागल्या. हे चालणं इथेच थांबलं नाही.
आपल्या पायावर उभं राहताना धडपडणाऱ्या अश्विनी भिसे यांनी शिलाई मशीनवर झपाझप पाय मारत आज स्वत:चा उद्योग उभा केला. खरं तर या अपघाताने त्यांच अवघं आयुष्यचं बदलून गेलं. शरीरानेच नाही तर त्या मनानेही खंबीर झाल्या. पाहा एका गृहीणी ते यशस्वी उद्योगिनीचा प्रवास...