तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्याला कडक शिक्षा करणार – यशोमती ठाकूर
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
या लॅबमधील टेक्निशियनवर 354, 376 हे विनयभंग आणि एट्रॉसिटीचे दोन्हीही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा दिली जाईल, ज्यामुळे इतरांना असे विकृत प्रकार करण्याची हिंमत होणार नाही, असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
https://youtu.be/9DDVN8I0N_0