चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई

Update: 2020-01-11 11:08 GMT

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर यांची मुंबईतील सदनिका आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीची काही मालमत्ता जप्त केली आहे. त्याचबरोबर या मालमत्तांचे किंमत ७८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अनेकदा त्यांची चौकशीही झाली आहे. या सर्व प्रकरणामुळे आरोपावरू चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. दरम्यान ईडीने यापूर्वी चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

https://twitter.com/ANI/status/1215585644996526082?s=20

 

 

 

Similar News