दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरसकट विशेष अनुदान राज्य सरकारने जाहीर करावं - श्वेता महाले
लॉकडाउनमुळं शेतकरी संकटात सापडल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. अशा बुलढाण्यातील शेतकऱ्यांची भाजपच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी भेट घेतली. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘कंपन्यांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहेच, सोबतच ज्या शेतकऱ्यांनी स्वतः जवळचं बीयाणं वापरुन पेरण्या केल्या. त्यासुद्धा व्यवस्थितपणे झालेल्या नाही आहेत. वास्तविक कृषी विभागाकडून या बियांचा जर्मिनेशन टेस्टिंग झालेलं असतानासुद्धा आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची वेळ आली. माझी शासनाला विनंती आहे या दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना विशेष अनुदान राज्य सरकारने जाहीर कराव. तसेच महाबीज व बोगस प्रायव्हेट कंपन्यांवरती तात्काळ कारवाई करावी’. असं भाजप आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.