गुलाबबाई संगमनेरकर यांना राज्य शासनाचा ‘तमाशासम्राज्ञी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Update: 2020-06-24 07:59 GMT

तमाशा म्हटलं की अनेकांच्या डोळ्या समोर येत ते फक्त नाच गाणी आणि बाई. अनेकांची ही नजर अजुनही बदललेली नाही. तमाशा या लोक केलेला प्रोत्साहन मिळावं व ही कला टिकावी यासाठी राज्य सरकार तर्फे या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलारांना दरवर्षी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येतं. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये ५ लक्ष, मानचिन्ह, मानपत्र असे आहे. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली असुन गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिले. राधाबाई बुधगावकर पार्टी मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बबुताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता- घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून उत्तम कला सादर करून त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. "गाढवाचं लग्न" या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता.

Similar News