गेल्या काही दिवसापासून १० वीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. कारण सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या तारखा जाहीर होत होत्या. मात्र, आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल आज म्हणजे 8 जूनला दुपारी १ वाजता लागणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान नुकत्याच लागलेल्या १२ वीच्या निकालाच्या गुणपत्रिका 11 जून रोजी देण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.