‘फडणवीसजी, बांगड्या भरा म्हणणं तुम्हाला शोभत नाही!’

Update: 2020-02-26 11:53 GMT

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर शिवसेना शांत आहे. त्यांनी बांगड्या भरल्या आहेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याचा शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. असं बोलणं माजी मुख्यमंत्र्याला शोभत नाही असं म्हणत आदित्य यांनी फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

‘सहसा मी तुम्हाला उत्तर न देणं पसंत करतो. तुम्ही बांगड्यांवरच्या वक्तव्याबाबत माफी मागितली पाहिजे. बांगड्या सर्वात शक्तीशाली महिला परिधान करतात. राजकारण सुरू राहील पण दृष्टीकोन बदलला पाहिजे. एका माजी मुख्यमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणं लज्जास्पद आहे’ असं आदित्य यांनी ट्विट करून म्हटलंय.

आदित्य यांच्या ट्विटला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

“शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील, खरं म्हणजे बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिलांना आवडत नाही. म्हणून मी तो शब्द वापरणार नाही,” असं फडणवीस या व्हिडीओमध्ये म्हणालेत. शिवसेनेनं बांगड्या घातल्या आहेत असं म्हणत असताना त्यांनी तात्काळ सावध होत त्याचं लागलीच स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

 

 

Similar News