निवडणुकांच्या हंगामामध्ये मतदान जागृती करण्यासाठी अनेक दुकानदार पुढे सरसावले आहेत. पुण्यातील लक्ष्मी नगर येथील नारायणी सिल्क साड्यांच्या दुकानात 3 दिवस महिला वर्गासाठी ही ऑफर सुरु आहे. बऱ्याच महिला मतदानाचा हक्क बजावत नाही त्यासाठी महिलांना ही विशेष ऑफर देण्यात आल्याचं दुकानाच्या मालकांनी सांगितलं आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये मोठ्याप्रमाणात मतदान व्हावं यासाठी अनेक जण जनजागृती करताना पाहायला मिळतेय. त्यातच पुणेरी संकल्पनेनं महिला वर्गांमध्ये उत्सुकता आणि मतदान करण्याची आवड निर्माण होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी ही ऑफर दिली गेली असून यामागे नेमका दुकानमालकाचा उद्देश काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शिरिष गवळी यांनी पाहा हा व्हिडिओ...
सौजन्य. मॅक्समहाराष्ट्र
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/400695117182891/
.