शिवसेनेला साथ देण्यास काँग्रेस तयार

Update: 2019-11-22 05:56 GMT

२०१९ च्या विधानसभेत भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) युतीला जनादेश मिळाला. मात्र युतीचा सरकार स्थापन झालं नाही. शिवसेनेशी हातमिळवणी केली तर याचा दूरगामी राजकीय परिणाम काँग्रेस (Congress) वर होनार आहे. मात्र केवळ नेत्यांचा दबाव आणि आमदार फुटण्याची भीती लक्षात घेऊनच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia gandhi) यांनी नेतेमंडळींचा विरोध डावलून शिवसेनेला साथ देण्यास मान्यता दिली.

या आधी शरद पवार (Shard pawar) यांनी घेतली असता सोनियांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. मात्र काँग्रेसमधला एक घट थेट शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होता त्यामुळे हा घट फुटण्याच्या भीतीमुळे सोनिया गांधी यांनी मान्यता दिली आहे. काँग्रेस प्रत्यक्षपणे सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव सुरवातीला होता. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका मांडल्यामुळे विकासाच्या अजेंडावर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे काँग्रेसने मान्य केले.

Similar News