आगामी 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मंगळवारी 2 एप्रिलला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जरी या जाहीरनाम्यात न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य अशी महत्त्वपूर्ण आश्वासनं असली तरी हा जाहीरनामा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आवडलेला नाही. त्यांनी जाहीरनाम्याच्या कव्हर पेजवर राहुल गांधींचा फोटो लहान आकारात छापल्यामुळे आक्षेप दर्शवला आहे.
दरम्यान यासंदर्भात सोनिया गांधी यांनी जाहीरनामा कमिटीचे सदस्य राजीव गौडा यांना फटकारले आहे. जाहीरनामा पुस्तिकेचे कव्हर पेज लोकांना आकर्षित करण्यासारखं असायला हवं. मात्र तसं झालं नाही. अशी बातमी लोकमत वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे.