प्रत्येकजण आयुष्यात स्वप्न पाहतो.काहींच्या स्वप्नाची पूर्तता होते तर काहींचे स्वप्न अपूर्ण राहते.अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पुर्ण करत उंच भरारी घेणारी ही आजच्या काळातील झाशीची राणी... सोनाली पाटील.
लहानपणापासून घरची परिस्थिती बेताची पण त्यावर मात करून उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून रूजू झाली.पण तिचा खरा संघर्ष लग्नानंतर सुरू झाला.सोनल यांच्या पतीकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता.त्यांचा एकंदरीत संसार उद्धवस्त झाला आणि त्यांचा घटस्फोट झाला.त्यात पोटच्या मुलीला नवऱ्याला द्यायला लागले .स्वत:च्या मुलीला दिल्यावर ती अधिक मानसिक तणावात गेली.एवढी उच्च शिक्षित असून देखील अशी परिस्थिती आल्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रास सहन करावा लागला.
या प्रचंड ताणतणावातून मार्ग काढण्यासाठी तिने एक अनोख स्वप्न पाहिलं.तिच्यातील अंगभूत कलात्मकता आणि दागदागिन्यांची आवड तिला स्वस्थ बसू देईना.त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी ती धडपडली आणि ते स्वप्न तिने प्रत्यक्षातही उतरवलं. केवळ दागिने घडवण्यापलीकडे जाऊन सौंदर्यविचार आणि सामाजिक कामाची सांगड घालत सोनल आर्ट कलेक्शन हा ब्रॅण्ड केला.तसेच सोनल आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी धडपडू लागल्या.या कठीण परिस्थितीमध्ये डिजिटल माध्यमांसोबत मैत्री झाली.डिजिटल माध्यमात रमू लागल्यावर तेथे दिसणारे लहान मुलांच्या विकासासाठीचे विविध प्रयोग आदिवासी मुलांसोबत करू लागल्या.त्याच्या हा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांना गौरविण्यात देखील आले.एवढेच नव्हे तर गेल्या अडीच वर्षांपासून व्हय सावित्रीबाई फुले बोलतेय!यावर एकपात्री प्रयोगाव्दारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.
स्वत:वर आलेले मानसिक तणावाचे जीवन अजून कोणत्या महिलेला भोगायला लागू नये. यासाठी तिला सक्षम करण्यासाठीचा हा एकपात्री नाटकाचा प्रयत्न....पुण्यातील सुषमा देशपांडे यांच्या कार्यशाळेतून सोनल यांनी या एकपात्री प्रयोगांसाठीचे धडे घेतले.त्या सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधन यासाठी काम ,घर सांभाळून हे एकपात्री प्रयोग सादर करतात.यासाठी कोणतेही मानधन शुल्क घेत नाही.या माध्यमातून सावित्रीबाईचे विचार आणि प्रबोधनाची चळवळ वाढविण्याचे या झाशीच्या राणीचे ध्येय आहे.
---- प्रज्वली नाईक.