‘त्या आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल’ तृप्ती देसाईंचा ईशारा
सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोना बाधितांना ठेवण्यात आलं होतं. मुलींच्या वसतीगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील कपाटांचे कुलुप तोडून साहित्यांची नासधूस केली. इतकचं नाही तर मुलींच्या कपड्यांवर अश्लील टिप्पणी देखील केली. या संदर्भात आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. कारवाईस विलंब केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
देसाई म्हणाल्या की, “हा प्रकार अत्यंत भीषण असून तिथं आतापर्यंत किती पुरुष रुग्ण होते याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी. त्याशिवाय मुलींचे शैक्षणिक उपकरणे आणि कागदपत्रे ताब्यात घ्यावीत.” अशी मागणी केली आहे.
तर “मुख्यमंत्री आणि सामाजीक न्यायमंत्री यांनी समंधीतांनावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत. कोरोनामुळे महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत आम्ही कोणतही तीव्र आंदोलन केलं नव्हतं. मात्र आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.” असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.