मोदींच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करणारी पहिली महिला

Update: 2020-03-08 08:03 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 2 मार्च रोजी आपण सोशल मिडीयाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असे ट्वीट करताच चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर मोदींनी “महिला दिनी, मी माझे सोशल मीडिया अकांऊट्स अशा महिलांसाठी देईन ज्या इतरांना त्यांच्या आयुष्य आणि त्यांच्या कामातुन प्रेरीत करतील.” असा खुलासा करत आपला हेतू स्पष्ट केला.

आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्नेहा मोहन दास या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. स्नेहा मोहन दास यांनी 2015 मध्ये या फूड बँकेची स्थापना केली होती. या संस्थेला घेऊन त्यांचे एकच उद्दीष्टे होते की भारतात कोणीही उपाशी राहणार नाही. बेघरांना अन्न देणे आणि उपासमार मुक्त भारत करणे हेच स्नेहा मोहनदास यांचे लक्ष आहे.

त्या असं सांगतात की, "माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ स्नेहा यांच्या आई मुलांना बोलावुन जेवण देत असे. आईचा आर्दश घेऊन हे काम पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प होता आणि त्यातूनच फूड बँकेची कल्पना आली."

 

 

Similar News