महिला सुरक्षिततेसाठी सरकारकडून मदत केंद्र व निर्भया निधी

Update: 2019-11-03 12:52 GMT

देशात बलात्कारांच्या घटनांमुळे अनेक महिला आत्मविश्वासाने घराबाहेर पडत नाहीत. भितीपोटी कित्येक मुलींचे पालक आपल्या मुलीला हव तसं स्वातंत्र्य देऊ शकत नाहीत.

२०१२ मध्ये दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या घटनेनंतर २०१३ मध्ये निर्भया निधीची स्थापना करण्यात आली होती. महिलांच्या सुरक्षतेतेसाठी हा निधी वापरली जावी हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यांसदर्भात ट्विट करून सांगितलं आहे की, “निर्भया निधीचा वापर हा देशातील संपूर्ण पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्र व सर्व जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करी विरोधी विभागांच्या स्थापनेसाठी करण्यात येणार आहे.”

Similar News