स्मृती इराणींचा अनोखा अंदाज

Update: 2019-11-17 09:57 GMT

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी या सोशल मिडीयावर चांगल्याच सतत चर्चेत असतात. सध्या त्यांचा तलवारबाजीचा व्हिडिओ मोठा व्हायरल होत आहे. या व्हिडीयोमध्ये स्मृती इराणी दोन्ही हातात तलवार घेऊन नृत्य करताना दिसत आहेत.

गुजरातच्या भावनगरमध्ये स्वामी नारायण गुरुकुल येथे मूर्ती स्थापना महोत्सव सुरु आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जाणाऱ्या या महोत्सवात शुक्रवारी महिलासांठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी उपस्थित होत्या.

यादरम्यान गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांनी विनंती केल्यानंतर स्मृती इराणी यांनी विद्यार्थिनींसोबत तलवार नृत्य केलं. त्यांच्या या नृत्याचा व्हिडीओ भाजप कार्यकर्त्याने ट्विट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Similar News