पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या महिला रिक्षा ड्रायव्हर कविता अमृत मायंदाळ यांनी आपली ड्रायव्हींगची आवड जोपासत उदरनिर्वाहासाठी आधी टेम्पो चालवायला सूरवात केली आणि आता त्या पूण्यातील महिला रिक्षा चालक म्हणून ओळखल्या जातात.
इतर स्त्रिंयाना तसेच मुलींना प्रोत्साहन देत कवीता मायंदाळ म्हणतात की, ‘स्त्रीयांमध्ये ही पुरूषाप्रमाणे ताकद असते आणि स्त्री ने घरात न बसता प्रत्येक क्षेत्रात धाडसी राहून जगात काही तरी करून दाखवलं पाहीजे’. सरकारने बऱ्याच संधी उपलब्ध दिल्या आहेत त्यांचा योग्य वापर केला पाहिजे.
पूर्वी स्त्रियांना रिक्षा चालवण्याचे परमीट मिळत नव्हते. आता, सरकारने परमीट उपलब्ध करुन दिल्याने आणि कवीता यांचा ड्रायव्हींगचा निश्चय पक्का असल्याने त्यांनी रिक्षा घेण्याचे धाडस केले. रिक्षा चालवायला सुरवात केली. कवीता मायंदाळ यांना दोन मूलं आहेत. त्यांचा मुलगा नुकताच डॉक्टर झाला आहे. आणि मुलगी शिकत आहे.