मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आजा राज्यभरात कार्यक्रम साजरे केले जात आहेत. विधानभवनातही मराठी भाषा दिन साजरा केला गेला. मात्र, या कार्यक्रमात भाजप आमदार श्वेता महाले एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
आमदार श्वेता महाले आपलं संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची आगळी वेगळी शैली यामुळे भारतीय जनता पक्षात चांगल्याचं परिचीत आहेत. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्यांनी विधानसभेत संस्कृत श्लोक असलेली साडी परिधान केली होती. या साडीमुळे त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. साडीवर “मातृभुमे! नमो मातृभुमे! नम: , तव गरिभ्यो नमस्ते नदीभ्यो नम:, तव वनेभ्यो नमो जनपदेभ्यो नम:” अशी संस्कृत वचनं लिहली आहेत.