उपनगरातील कोरोनाचा वाढता प्रभाव बघता रुग्णालये अपुरी पडत आहेत. भाभा रुग्णालय, कूपर रुग्णालय, व्ही एन देसाई रुग्णालय येथे नवीन रुग्ण दाखल करून घ्यायला जागा नाही. अशा वेळी सांताक्रुझ पश्चिम येथील सांताक्रुझ रेसिडेंट असोसिएशनचे धर्मादाय आयुक्त यांच्या अधिपत्याखालील विश्वस्त संस्थेचे आशा पारेख रुग्णालय सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी शिवसैनिक जितेंद्र जानावळे यांनी केलीय.
रुग्णालयाची डागडुजी करून ते अद्यावत करावे आणि सामान्य नागरिकांसाठी तसेच करोना रुग्णांच्या उपचारासाठी चालू करावे. ही नितांत गरज आहे, नाहीतर भविष्यात हेच रुग्णालय दिल्ली , अहमदाबाद ची एखादी खासगी कंपनी ताब्यात घेऊन सुपर स्पेशल हॉस्पिटल तयार करतील आणि गरिबांना गेट वरून विनाउपचार हाकलतील. इतर खासगी रुग्णालयांप्रमाणे लुटीचा धंदा चालू करतील. असं मत त्यांनी व्यक्त केलंय.