पुन्हा हिंगणघाट नको तर, शिवाजी महाराजांचा ‘हा’ गुण हवा...

Update: 2020-02-19 08:30 GMT

हिंगणघाट जळीत कांडाच्या घटनेनं हादरलेल्या वर्धा जिल्ह्यात आज शिवजयंतीच्या निमित्ताने विविध संघटनांच्या वतीने भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना थांबवायचं असेल तर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांप्रतीचा आदर हा गुण सर्वांनी अनुसरणं आज काळाची गरज आहे. या उद्देशातून ही रॅली आयोजित करण्यात आली.

जिल्ह्याच्या सर्वच भागात पूर्णपणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. जिजाऊंच्या आणि पारंपारिक वेशभूषांमध्ये लहान मुलं आणि वयोवृद्धांसह सर्वांनी जोशात आपला सहभाग दाखवला. शिवाजी महाराजांच्या जयघोषात शहराच्या प्रमुख मार्गाने भ्रमण करत शिवाजी महाराज स्मारकाजवळ येऊन महाराजांना अभिवादन करुन आदरांजली वाहण्यात आली.

 

Similar News