'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या दुसऱ्या मुलीचा जन्म सरोगसीमधून

Update: 2020-02-21 13:19 GMT

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा च्या (Shilpa Shetti Kundra) कुंटुंबात एक आनंदाची लाट पसरलीय. ती पुन्हा एकदा आई झाली आहे. शिल्पाच्या घरी आलेल्या या लहानशा परीचा जन्म १५ फेब्रुवारीला झाल्याची पोस्ट शिल्पाने केली आहे. विशेष म्हणजे सरोगसीच्या माध्यमातून तिच्या मुलीचा जन्म झालाय.

शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा हात असलेला फोटो शेअर केलाय. यात तीने मुलीचं नाव समीशा ठेवल्याच सांगितलं. या नावाचा अर्थही तीने स्पष्ट केला, ‘स’ म्हणजे संस्कृत भाषेत ‘असणं’ आणि ‘मिशा’ म्हणजे रशियन भाषेत ‘देवासमान’. तुम्हाला या नावाला ‘लक्ष्मीदेवी’ असंही म्हणता येईल.

Similar News