मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी स्वाभिमानी पक्षातील (sharmila yewale) शर्मिला येवले चर्चेत आली होती. काही दिवसांपुर्वीच शर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर या प्रवेशावरुन तिला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंग बाबत बोलतांना शर्मिला यांनी ‘मॅक्सवुमन’सोबत आपली मतं मांडली. त्यात आपण या ट्रोलींगकडे खुपच सकारात्मक बघत असुन, आपल्यावर लोक इतके प्रेम करतात हे पाहुन बरंच वाटलं असल्याचं त्या सांगतात. मात्र सोशल मिडीया हे खुप आभासी जग आहे त्यामुळे या प्रेमाला, ट्रोलिॅगला न भुलता मी केवळ माझं काम करत राहीन असं त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात आजही बोलणा-या मुलींना आगाऊ असे कुत्सीततेनं म्हटलं जातं. तर हो मी आगाऊच मुलगी आहे. जी प्रश्नही मांडणार आणि बोलणारही असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांचा प्रचार करणार का? अशी विचारणा सतत सोशल मिडीयावर होत असतांना पक्ष सांगेल ती कामं मी निष्ठेनं करणार आहेच. मात्र इतर प्रश्नांसाठीही माझे काम सातत्याने चालुच राहील असं त्या म्हणाल्या आहेत.