शरद पवार हे बारामतीपुरतेच मर्यादित आहेत - अंजली दमानिया

Update: 2019-09-25 15:48 GMT

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी ने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद पुकारण्यात आला. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली.

पवारांविरूद्ध ट्विट करताना दमानिया म्हणाल्या की, “हा सगळा किळसवाणा प्रकार आहे. चोर तो चोर, वर शिरजोर... बारामती कायमची बंद राहिली तरी कुणाला फिकीर आहे? तसंच तुम्ही बारामतीपुरतेच मर्यादित आहात हे दाखवून दिलंत’, असाही टोलाही दमानिया यांनी ट्विटरवरून केला आहे.

दमानिया एवढं बोलून थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये बँक घोटाळ्याच्या प्रकरणातील कारवाईवर प्रतिक्रिया देऊन, राजकारण्यांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, “खूप आनंद झाला आहे. पण याचा शेवट अपेक्षित होणार की निवडणूक झाली की सगळं थंड होणार?,” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Similar News