देशभरात कोरोना विषाणू मोडीत काढण्याच्या हेतूने जनता कर्फ्यू पाळला जातोय. नागरिकांनीही या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या शाहिनबाग येथून नागरिकत्व संशोधन कायदा(CAA), एनपीआर (NPR) आणि एनआरसी (NRC) विरोधात आंदोलन सुरु आहे.
कोरोना व्हायरस सारख्या संकटकाळात हे आंदोलन सुरु ठेवणं कठीण झालं आहे. मात्र, महिलांनी एक चांगलीच युक्ती लढवत आपलं आंदोलन आजच्या दिवशीही चालू ठेवलं आहे.
शाहिनबाग मधील महिला आंदोलनकर्त्यानी प्रदर्शन स्थळावरिल आपल्या बेडवर चप्पल आणि पोस्टर ठेऊन हे आंदोलन सुरु ठेवलं आहे. या पोस्टरवर “NO, NPR/NRC/CAA, Silent peace” असं लिहलंय.