सुवर्ण संधी, सोन्यात गुंतवा

Update: 2019-04-06 10:04 GMT

सोन्याचं आकर्षण काही केल्या सुटेना. महिलांमध्ये जरा जास्तच. कितीही भाववाढ होवो, अडीअडचणीला उपयोगी पडेल, असं गुंजभर सोनं गाठीशी असलं पाहिजं, यादृष्टीने महिला जमेल तसं सोनं खरेदी करतात. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सोनेखरेदी होईलच. बाजारात वातावरण सकारात्मक आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सोन्याच्या दर, ३१८०० रुपये प्रतितोळा इतका खाली आला आहे. दोन महिन्यापूर्वी हाच दर ३४ हजारांच्या पार पोचला होता. त्यामुळे मुहर्ताचे सोनं खरेदी करायला गर्दी तर होणार, असा विश्वास सराफांना वाटत आहे.

फक्त गुढीपाडवाच नव्हे तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत लगीनसराईचे मुहूर्त आहेत. त्यासाठी लागणाऱ्या दागिन्यांचे बुकींग तर आधीच झालेले आहे. त्यातच भविष्यात सोनेदर वाढीची टांगती तलवार ही आहेत. त्यामुुळे उद्याची खरेदी आजच करूया, असा काहीसा ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे यंदाचा पाडवा ग्राहकांसाठी आणि सराफांसाठी गोड असणार यात शंकाच नाही.

Similar News