घरामध्ये प्रमुख म्हणून पुरुष असतो मात्र घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा कुटुंबाची सर्व जबादारी महिलांवर येते. अशीच घटना तामिळनाडूमध्ये सेलम या ठिकाणी घडली. कर्जात बुडालेल्या पतीने गेल्या महिन्यात आत्महत्या केल्यामुळे ३१ वर्षीय महिलेवर आपले केस विकून तीन मुलांचे पालनपोषण करण्याची वेळ आली. पतीचे सेल्वमकडे असलेले थोडेफार पैसे संपल्यानंतर अखेर तिला तीन लहान मुलं. एक मुलगा ५ वर्षांचा, दुसरा तीन आणि तिसरा दोन वर्षांचा असल्यामुळे यांचा पालनपोषण करण्यासाठी तिला स्वतःचे केस विकून आपला कुटूंब चालवण्याची वेळ आली आहे. हे दोघं पती-पत्नी वीटभट्टीवर काम करत होते. कर्जाच्या फसवणुकीत संपूर्ण कुटुंब कर्जात बुडाले होते. एका व्यक्तिने विगसाठी तिचे केस मागितले असता तिने ते १५० रुपयांत दिले. मुलांसाठी तिने आपले केस विकले असून तिने याआधी आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते.