लोकसभा निवडणुकांचे वातावरण वेगळ्या रंगात रंगलय की काय असं चित्र दिसू लागलेय. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा बचाव करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा सरसावले आहेत.
साध्वीवर खोटे आरोप करून तिला बोगस प्रकरणात अडकवण्यात आलं, असं शहा म्हणाले. साध्वीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचं स्पष्ट झालं, असं शहा म्हणाले.