लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आपल्या विधानावरून चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. या बेताल वक्तव्यानंतर देशभर साध्वी व भाजपवर टीकेचे झोड उठली. यावरती भाजपने समज दिली असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर प्रवक्ते व भाजप नेते हितेश वाजपेयी यांनी, 'प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली असून, आपले विधान मागे घेतले असल्याचे स्पष्टीकरण दिले.