अमृता फडणविसांच्या "या" वादग्रस्त पोस्टवर काँग्रेस प्रवक्त्याने केला खुलासा
अमृता फडणवीस यांची चर्चा माध्यमातून होत असते. त्यांच्या फेसबुक, ट्वीटर आणि इंन्स्टाग्रामवर केल्या जाणाऱ्या पोस्ट नेहमी चर्चेत राहतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांनी काळ (बुधवारी) मकरसंक्रांतीचा औचीत्य साधत शुभेच्छा देतानाचा आपला एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत असून नेटकर्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. यासंदर्भात सी. सुप्रिया या महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या असून हा फोटो आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवर पोस्ट करत त्याला एक कॅप्शन दिल्यामुळे ट्रोल करणाऱ्या अनेक कमेंट आल्या.यावर आज (गुरुवारी) त्यांनी खुलासा देत आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंट वरून पोस्ट लिहली
"२ दिवसांपूर्वी मी अमृता फडणवीस ह्यांच्या संदर्भात एक पोस्ट टाकली होती. सदर पोस्ट माझे पूर्णपणे वैयक्तिक मत असून पक्षाशी ह्या पोस्टचा काहीही संबंध नाही हे माझं वैयक्तिक मत आहे"
असं त्यांनी आपल्या पोस्ट मधून सांगितलं आहे.