ग्रामीण भागातील महिलांना 'सावली' ची छाया

Update: 2020-01-05 06:38 GMT

सावित्रीबाई फुले यांच्या १८९ जयंतीचे औचित्‍य साधून 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलचे उद्घाटन मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रश्‍मी उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,खासदार गजानन कीर्तिकर,महापौर किशोरी पेडणेकर,अमित साटम ए उपस्थित होते. 'माविम'चा उद्देश हे आहे की ग्रामीण भागातील महिला नोकरी करण्यासाठी मुंबईत येत असतात या महिलांना निवासाचा प्रश्न समोर असतो यासाठी पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्याचा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. या महिलांना राहण्यासाठी 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार गजानन किर्तीकर यांनी यावेळी 'माविम'ने महिलांसाठी असे वसतिगृह मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी करावे अशी सूचना दिली. ‘माविम’च्या माध्यमातून इतर जिल्ह्यातदेखील अशी वसतिगृहे उभारण्याचा मानस असल्याचे ‘माविम’च्या अध्यक्ष रश्‍मी ठाकरे यांनी सांगितले.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1213473608724467712

 

 

 

 

 

Similar News