गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणा नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हैदराबाद, उन्नावमधील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेतली आहे. जे आरोपी पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहेत अश्या आरोपीनां दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले. मात्र या दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे हे करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल असं त्यांनी संगितलं.
https://youtu.be/2dWg7cOtq78