ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक विद्या बाळ यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.