फॅशन शो मधील प्रियांका चोप्राच्या लुकची चर्चा चांगलीच रंगली आहे. . त्यानंतर प्रियंकाच्या त्या लूक मधील फोटोचा वापर करून अनेक जणांनी विनोदी फोटो तयार केले.प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जींचा त्या लूक मधील फोटो फेसबुकवर पोस्ट केला.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शर्मा याना सुनावणीदरम्यान दिलासा दिला आहे. प्रियांका शर्मा यांनी माफी मागितल्यास जामीन देऊ असं सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले. त्यास
शर्मा यांनी मान्यता दर्शविल्याने त्यांना जामिन देण्यात आले आहे. दिलेल्या तक्रारीनंतर शर्मा यांना 10 मे रोजी ही अटक करण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हणजेच आज हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला होता.
Supreme Court observes, "We can grant bail but she has to apologise." https://t.co/9447YdJQuG
— ANI (@ANI) May 14, 2019