बीड जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. ही ओळख यंदाच्या पावसाने कायम ठेवली आहे ती ओल्या दुष्काळाच्या रुपात. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर क्षणीक आनंद खुलवला. बीड जिल्ह्यात दरवर्षी पावसा अभावी कोरडा दुष्काळ पडतो. परंतु यंदा तेथील शेकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरं जाव लागतयं.
यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याच पिकांची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे, जास्तीचे नुकसान झाले आहे. कारण जायकवाडीचे पाणी गोदापात्रात सोडल्याने, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेलं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने देखील मोठं नुकसान झालं आहे.