एका गर्भवती महिलेला रस्ता खराब असल्यानं गावापासून एक किलोमीटर दूर खाटेवर बसून रुग्णवाहिके पर्यंत न्यावं लागलंय. ही घटना आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील खडकीची. खडकी - हसनाबाद रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहिका पोहचू शकत नाही.
त्यामुळे गावात एखादी व्यक्ती आजारी असल्यास किंवा गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करायचे झाल्यास बाजल्याच्या मदतीने एक किलोमीटर अतर चालत घेऊन जावं लागतं. त्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रवास या इथल्या गावकऱ्यांना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तिची वारंवार मागणी करुनही काम होत नसल्याने गावच्या वाट्याला ही पीडा आली आल्याचं गावकरी सांगतात.