एके काळी शिवसेनेची सत्ता असलेला अमरावती मधील तिवसा मतदार संघ हा आमदार यशोमती ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या ताब्यात घेतला. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सचिव आणि प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यअध्यक्ष यशोमती ठाकूर यांच्या नावानं आता हा मतदार ओळखला जातो. यशोमती ठाकूर या सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत विधानसभा निवडणूकीत, विदर्भातून निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार आहेत.
भाजपाच्या हाती न येऊ शकलेल्या तिवसा मतदार संघावर आता भाजपा ची बारीक नजर आहे. यासाठी तिवसा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी जवळ-जवळ 17 उमेदवार असल्याचा दावा भाजपा ने केला आहे. ईच्छूकांची यादी जरी भली मोठी असली तरी यशोमती ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी ठोस चेहरा अद्याप पर्यत समोर आला नव्हता. यामुळे भाजपामध्ये चिंतेचं वातावरण होतं. यावर तोडगा काढत तसंच यशोमती ठाकूर यांना आव्हान देण्यासाठी भाजपाने माजी पालक मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
सध्या यशोमती ठाकूर यांचा पारडा जरी भारी असला तरी, जिंकणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा मानणाऱ्यांपैकी एक प्रवीण पोटे आहेत. यामुळे हा सामना अटीतटीचा असणार आहे.