पंतप्रधान कार्यालयात चित्रकार प्रणिता प्रविण बोरा हिचे ‘उलुखबन्धनम्’ या ‘कॉन्टॅप्ररी आर्ट’ या शैलीतील चित्र लावण्यात आले आहे. नाकी-डोळी नसलेल्या या चित्रातून व्यक्त होणारे भाव याची खासियत असून सगळ्यांच्या मनावर वेगळीच छाप उमटवणारे चित्र आहे. या चित्रात नटखट श्रीकृष्णाचे वर्णन करण्यात आले आहे. दरम्यान प्रणिता बोराने, आपल्या चित्रांची निवड पंतप्रधान कार्यालयासाठी होणं हा माझासाठी मोठा बहुमान आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असून माझावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. असं म्हटलंय.
केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रणिताला ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाली होती. त्यावेळी तिने चित्रांचे पुस्तक तयार करुन अकादमीकडे दिले होते. अकादमीनेच स्वत:हून तिची चित्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील निवड समितीने प्रणिताच्या चित्राची निवड केली आहे.
कोण आहे चित्रकार प्रणिता बोरा?