प्रज्ञासिंह यांची माफी

Update: 2019-05-17 08:28 GMT

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्प्या १९ मे ला असून भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा आपल्या विवादित विधानावावरून चर्चेत आल्या आहेत. या विधानावरून देशभरात भाजप सरकारवर टीका होत आहे. दरम्यान याचा निषेध म्हणून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “महात्मा गांधींचा मारेकरी देशभक्त, हे राम”, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. 'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. या विधानावरुन वाद होताच प्रज्ञासिंह यांनी विधान मागे घेत माफी मागितली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Similar News