Positive News: 36 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात

Update: 2020-05-28 07:10 GMT

देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत महाराष्ठ्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दिवसागणिक रुग्णांमध्ये होणारी वाढ फारच चिंताजनक आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सतत सरकारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था कोरोनाशी लढत आहेत. या चिंतावह परिस्थितीत एक आशादायी घटना समोर आली आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात फक्त ३६ दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्णाण झालेलं आहे.

हे ही वाचा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी या अवघ्या ३६ दिवसांच्या विजयी कोरोना वॉरियरचा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, “जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला वयाचं बंधन नसतं. मुंबईच्या सायन रुग्णालय़ात ३६ दिवसांचं बाळ कोरोनामधून बरं झालं आहे. डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय च्या टीमचं अभिनंदन.”

Similar News