मुंबईतील उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यात थेट लढत झाली. या चुरशीच्या लढतीत प्रिया दत्त गेल्यावेळच्या पराभवाचा वचपा काढतात की पूनमच पुन्हा बाजी मारतात, याचा फैसला आज होणार आहे. सध्या पूनम महाजन १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत तर प्रिया दत्त या पिछाडीवर आहेत.