जगभरात महिला दिवस साजरा केला जातोय परंतू जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सिद्धवा जायभाये असं पोलिस अधिकाऱ्यांचं नाव असून सुदैवाने या हल्ल्यात त्या बचावल्या आहेत. जायभाये या पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वसई युनिटमध्ये त्या कार्यरत आहेत.
जायभाये आपल्या खासगी मोटारीने शनिवारी रात्री घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला केला. अहमदाबाद मुंबई मार्गावर विरारजवळील बर्गर किंग हॉटेलजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.