कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या धीराने तोंड देत आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून ते सातत्याने लढत आहे. मात्र त्यांचीही कोणीतरी घरी वाट पाहतय हे आपण विसरतो आहोत. रुग्णसेवा करणाऱ्य़ा आपल्या डॉक्टर आई – बाबांची मुलं वाट पाहत आहे. घरी आले तरी त्यांना स्पर्शही करु शकत नाही याहुन दुसरं दु:ख तरी त्या मुलांचं काय असा प्रश्न पडतो.
ही खंत मांडलीय अनुष्का संतोष नागरे या १० वर्षाच्या मुलीने. तीचे वडीलही डॉक्टर आहेत आणि ती आपल्या वडिलांना आणि त्यांच्यासारखचं इतर डॉक्टरांना कोरोना विरोधात लढायला फक्त थोडा आराम मिळावा अशी प्रार्थना करतेय.
आज या लढाईत डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्याचा अथकपणे प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना तेव्हाच येऊ शकतं जेव्हा नागरिक घरात राहतील आणि कोरोनाचा फैलाव होणार नाही. अशी भावना तीने आपल्या कवितेतून व्यक्त केलीय.