पंतप्रधानांच्या 86 मिनिटांच्या भाषणात महिलांसाठी फक्त 2 मिनिटे 39 सेकंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना देशातील महिला यशस्वी करतील. असा विश्वास व्यक्त केला पण, देशातील महिला सशक्तीकरणावर पंतप्रधानांनी फक्त 2 मिनिटे 39 सेकंदात मुद्दा संपवला.
या 17 मिनिटात पंतप्रधान या 8 मुद्द्यांवर बोलले...
- भारतात महिला शक्तीला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचं नावं रोषण केलं.
- भारतात महिला कोळसा खाणीत करण्यापासून लढाऊ विमानांतून आकाशाला गवसणी घालतायत.
- ४० कोटी जनधन खात्यातील २२ कोटी खाती महिलांची आहेत.त्यात 30 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
- मुलींच्या लग्नाचं वय किती असावं याबाबत विशेष समिती तयार करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांच्या वयाबाबतही निर्णय घेतला जाईल.
- प्रधानमंत्री आवास योजनते देखील अधिकाधिक महिलांच्या नावे घर होत आहे.
- मुद्रा लोन अंतर्गत देशात 25 कोटी रुपये देण्यात आले. त्यात 70% या महिला आहेत.
- सरकारला गरीब बहिणी आणि मुलींच्या आरोग्याची काळजी असल्याने आम्ही एका रुपयात 5 कोटींपेक्षा जास्त सॅनिटरी पॅड्स प्रदान केले आहेत.
- देशाच्या महिलांमधील क्षमतेवर विश्वास आहे. भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो. त्यामुळेच आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा जगाला भारताकडून अपेक्षा देखील आहेत. आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी तयारी करायला हवी.
पंतप्रधानांनी भाषणातील 50 मिनिट 30 सेकदांनी महिलांच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली. व 53 मिनिट 5 सेकंदात त्यांचा हा मुद्दा संपला सुध्दा.